डॉ. कुणाल खेमणार
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापुर

श्री एस.डी. सोनवणे
गट विकास अधिकारी
पंचायत समिती चंदगड

श्री. जगनाथ हुलजी
सभापती
पंचायत समिती चंदगड

अँड एस. एस. कांबळे
उपसभापती
पंचायत समिती चंदगड
   चंदगड पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे.
संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहेत. आपल्या सुचना, अभिप्राय व मार्गदर्शन विकास प्रक्रियेतील आमचे प्रेरणास्त्रोत असतील. संकेतस्थळामधील योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत लाभ घेतला जाईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.

 

Digital Grampanchayat

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही ‘डिजिटल ग्राम’ संकल्पना राबवली आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची माहिती, विविध योजना यांची माहिती मिळेल.

Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.

आमचं चंदगड:

image

चंदगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका (मतदार संघ) म्हणून ओळखला जातो. या तालुक्याची पश्‍चिम आणि पूर्व अशा दोन विभागामध्ये विभागणी करता येते. पश्‍चिम भाग अतिपावसाळी, डोंगराळ, वनक्षेत्र असलेला तर पूर्वभाग  सुपीक जमीन लाभली आहे.

किल्ले पारगड :

 किल्ले पारगड महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्य़ाचा दक्षिण टोकावरील चंदगड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेला एक नितांतसुंदर किल्ला. हिरव्यागार वनराईच्या कवेत, विविधतेने नटलेल्या घनदाट जंगलाच्या सान्निध्यात विसावलेला किल्ले पारगड इतिहासाचा साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे.